PM Internship Scheme 2025 Registration Criteria and eligibility :- नमस्कार मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये पंतप्रधान इंटरशिप योजना या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जसे कि नेमकी हि योजना काय आहे, या योजेंसाठी कोण पत्र होऊ शकतो, अर्ज कसा करायचा आणि या योजनेचा लाभ कोण कोणाला मिळणार आहे या बद्दल सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात सर्व माहिती.
PM Internship Scheme 2025 म्हणजे काय?(What is PM Internship Scheme 2025?)
PM Internship Scheme म्हणजे हि एक केंद सरकार ची योजना आहे जी सुशिक्षितबेरोजगार तरुणांना महिन्याला काही मानधन देते तिचा direct लाभ हा उमेदवारांना online पद्तीने दिला जातो . ज्यामध्ये ज्या स्टार्ट अप कंपन्या / किवा मोठ मोठ्या कंपन्या online नोंदणी करतात. जे सुशिक्षित बेरोजगार असतील ते इथ जाऊन काही ठराविक कालावधी साठी काम करून अनुभव घेऊ शकतात त्यच्या बदल्यात त्यांना काही मानधन हि मिळते त्यामुळे जे विद्यार्थी नवीन कॉलेज पास होतात त्यांना नोकरी लवकर मिळण्यास मदत होते. आणि ते त्या कंपन्यामध्ये पूर्ण वेलासाठीही अर्ज करू शकतात . खरच हो योजना खूप चांगली आहे.

PM Internship Scheme 2025 योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती(Complete detailed information about PM Internship Scheme 2025)
Prime Minister Internship Scheme 2025 :- केंद्रीय व्यवहार मंत्रालयाद्वारे सुशिक्षित तरुणांना मोठ मोठ्या कॉम्ण्यामध्ये खूप मोठी इंटरशिप करण्याची संधी देणार आहे ज्यामध्ये जास्तीतीत जास्त लोकांना रोजगार प्रदान करून देण्याचे ध्येय आहे ज्यामध्ये ५०० पेक्षा जास्त मोठ मोठ्या कंपन्या असणार आहे जसे कि हि योजना काढण्यामागे १ कोटी पेक्षा जास्त लोकांना इंटरशिप देण्याचे उद्दिस्त आहे. जसे कि दिनाक ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी पासून पायलट ताप्यासाठी चाचणी घेण्यात आली होती ज्यामध्ये बर्याच कंपन्यांनी नोंदणी सुधा केलेली आहे. हि पहिली फेरी होती आता लवकरच दुसरी फेरी होणार आहे ज्यामध्ये उमेदवारांना लवकरच नोंदणी करता येणार आहे.
PM Internship Scheme 2025 बद्दल बर्याच लोकांना भरपूर प्रश्न पडतात ते प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण खाली सविस्तर पाने जाणून घेऊयात.
PM इंटरशिप योजनासाठी जर online अर्ज करायचा असेल तर या साठी online website कुठली आहे? (If I want to apply online for the PM Internship Scheme, what is the online website for this?)
जर तुम्ही हि या योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला मी ती वेबसाईट सांगतो ती वेबसाईट पुढील प्रमाणे असेल
PM Internship Scheme Online Website: https://pminternship.mca.gov.in/login/
जिथे जाऊन तुम्हाला या योजेसाठी सर्व माहिती मिळते जसे कि योजनेबद्दल माहिती , अर्ज कसा करायचा कुठल्या कुठल्या कंपन्या साठी इंटरशिप करता येईल हे सर्व तुम्हला या वेबसाईट वर पाहता येईल
PM इंटरशिप योजनासाठी आगोदर काय करावे लागेल?(What needs to be done in advance for the PM Internship Scheme?)
सर्वात आगोदर तुम्हाला वर दिलेल्या वेबसाईट वर जाऊन तुमचे स्वतःचे खाते बनवावे लागेल खाते कसे बनवायचे याचीही सविस्तर माहिती मी खाली दिली आहे.
PM इंटरशिप योजनासाठी online अर्ज कसा करावा / नोंदणी कश्याप्रकारे करायची?(How to apply online for PM Internship Scheme / How to register?)
या योजनेसाठी online अर्ज कसा करायचा याची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती आपण पाहूयात
- सर्वात आगोदर तुम्हाला या योजनेच्या official वेबसाईट https://pminternship.mca.gov.in/login/ official वेबसाईट वेबसाईट वर जायचे आहे.
- या वेबसाईट च्या official होम पेज वर गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा /Youth Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर एक नवीन होमपेज उघडेल.
- तिथ तुम्हाला नोंदणी करण्यसाठी काही तपशील भरण्यास सांगितला जाईल to तपशील भरून submit या button वर क्लिक करा.
- जी माहिती तुम्ही तिथ भराल त्या नुसार एक तुमचा बायोडाटा / म्हणजेच रीजुम तयार केला जाईल
- ज्या शेत्रात तुमची इच्छा म्हणजेच आवड असेल त्या नुसार तुम्ही कुठलेही क्षेत्र निवडू शकता तिथ जाऊन तुमचे आवडीचे क्षेत्र निवडा ज्यामध्ये तुम्हाला ठिकाण, क्षेत्र, भूमिका, आणि पात्रता यावर आधारित कुठल्याही ५ इंटरशिप साठी अर्ज करता येईल.
- हे सर्व भरून झाल्यानंतर Submit या button वर क्लिक करून ते पूर्ण झाले का नाही त्यसाठी ते पेज download करून घ्या.
- त्यनंतर तुम्हाला त्याची एक hardकॉपी काढून तुमच्याजवळ ठेवायची आहे.
अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी online नोंदणी / अर्ज करू शकता.
PM इंटरशिपसाठी / नोंदणी करत असताना कुठली कुठली कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे?(What documents are required to be kept with me while registering for PM Internship?)
जे उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील त्यांना नोंदणी करत असताना पुढील काही महत्वाची कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे.
- ज्य्मध्ये ज्या उमेदवाराचे नोंदणी करायची आहे त्याचे स्वतःचे आधरकार्ड
- तुमचे जे शिक्षण पूर्ण झाले आहे त्याची सर्व कागदपत्र ज्यामध्ये तुमच्या परीक्षेच्या निकालानुसार सर्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल number लिंक असणे आवश्यक आहे जर मोबाईल number लिंक नसेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा पत्ता त्यवर अपडेट असणे आवश्यक आहे.
- जर तुमची सर्व माहिती अपडेट असेल तर काही माहिती तुम्ही एडीट हि करू शकता.
PM इंटरशिप योजनेसाठी नवीन खाते तयार केल्यानंतर कुठल्या क्षेत्रामध्ये अर्ज करता येईल?(In which field can I apply after creating a new account for the PM Internship Scheme?)
जे लोक या योजनेसाठी पात्र असतील त्यसाठी विविध क्षेत्रासाठी अर्ज करता येईल ज्यामध्ये सर्वप्रथम तुमचे आवडीचे क्षेत्र निवडायचे आहे त्या मध्ये पुढील प्रमाणे क्षेत्र असतील
- आयटी आणि सोफ्टवेअर development क्षेत्र असेल
- जर तुम्हाला बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रही असेल
- तेल आणि वायू क्षेत्रासाठहि अर्ज करता येईल
- जर तुम्हाला धातू आणि खाणकाम या शेत्रात आवड असेल त्य साठीही अर्ज करता येईल
- fmcg म्हणजेच खाद्य आणि ग्राहक सेवा यामध्येही अर्ज करता येईल
- टेलिकॉम या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर संधी आहेत
- बांधकाम आणि पायाभूत्सुविधा
- रेटेल क्षेत्र
- ऑटो
- कृषी
- कापड उद्योग क्षेत्र
- आरोग्य क्षेत्र
- आणखी काही आजून क्षेत्र आहेत ते तुम्हाला जर पहायचे असतील तर तुम्ही वेबसाईट ला जाऊन पाहू शकता ती वेबसाईट मी तुम्हाला वर दिली आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि या योजनेसाठी काही वयाची अट आहे का? हो यासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त वयाची अट आहे ती पुढील प्रमाणे
PM इंटरशिप योजना अर्ज करण्यसाठी वयोमर्यादा / पात्रता काय?(What is the age limit/eligibility for applying for PM Internship Scheme?)
हि जी योजना आहे हि एक फक्त इंटरशिप योजना आहे ज्यामध्ये ज्या व्यक्तीचे कमीत कमी वय हे २१ आणि जास्तीत जास्त वय २४ आहे हे लोक या साठी अर्ज करू शकतात म्हणजेच पात्र होऊ शकतात.
त्याचबरोबर या योजनेसाठी आजून एक अट आहे ती म्हणजे शिक्षण
PM इंटरशिप योजना शैक्षणिक अट काय आहे? (What is the educational requirement of PM Internship Scheme?)
- या योजनेसाठी ज्या उमेदवाराला अर्ज करायचा आहे त्याचे कमीत कमी शिक्षण हे इत्त १० वी पास , उच्च माद्यामिक शिक्षण म्हणजेच १२ वी पास पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे किवा ba , bcom, bca, bba, bfarm यातील कुठलीही पदवी प्राप्त केलेली असावी.
हि पात्रता खूप महत्वाची आहे हे लक्षात ठेवा.
PM इंटरशिप योजना दुसरा टप्पा सुरवात कधीपासून होईल?(When will the second phase of the PM Internship Scheme start?)
- जसे कि तुम्ही वर वाचले असेल पहिला टप्पा पूर्ण झाला आहे दुसरा टप्पा लवकरच चालू होईल याची आजून तारीख आलेली नाही पण जसे कि केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात हे येईल याचा अंदाजा दिला आहे . जर या योजेनेबद्दल आजून काही महीति आली तर आम्ही लवकरच अपडेट करू त्यासाठी या वेबसाईट दैनदिन भेट देत चला. ज्यामुळे तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील.
PM इंटरशिप या योजनेसाठी कोण अर्ज करू शकत नाही?(Who cannot apply for the PM Internship scheme?)
- ज्या उमेदवाराचे वय २१ पेक्षा कमी आणि २४ वर्षापेक्षा जास्त असेल ते उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
- जर काही उमेदवार दुसरीकडे कुठे पूर्ण वेळ नोकरी करत आसल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या उमेदवाराचे वार्षिक उत्तपन हे ८ लाखापेक्षा जास्त असेल ते या साठी पात्र नसणार आहेत
- जर उमेदवार च्या घरातील कोणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही
PM इंटरशिप या योजनेसाठी केंद्र सरकार कडून काही पगार मिळेल का?(Will I get any salary from the central government for this PM Internship scheme?)
- या योजनेसाठी जे उमेदवार अर्ज करतात ते जेव्हा या योजनेसाठी पात्र होतात त्यांना केंद्र सरकार आणि कंपनी यांच्यामार्फत प्रतेक महिन्याला ४५०० + ५०० = ५००० रुपये रक्कम जे उमेदवार असतील त्यांना केंद्र सरकारच्या बेनिफिट ट्रान्स्फर (DBT) मार्फत उमेद्वारच्या आधार number च्या बँक खात्यात त्याची रक्कम हस्तांतरित केली जाते.
PM इंटरशिप योजनेचा कार्यकाळ / कालावधी किती दिवसाचा आहे?(How long is the tenure/duration of the PM Internship Scheme?)
- या योजनेमध्ये उमेदवार जास्तीत जास्त एक वर्ष साठी इंटरशिप करू शकतो.
PM इंटरशिप योजना हेल्प लाईन आणि तक्रार हेल्प लाईन number कुठला आहे?(What is the PM Internship Scheme online Helpline and online Complaint Helpline number?)
जर तुम्हाला या योजनेचा अर्ज भरताना किवा इंटरशिप करत असताना काही अडचण आली तर तुम्ही खाली दिलेल्या number वर फोन करून तुमची सविस्तर तक्रार नोंदवू शकता.
जर तुम्हाला तक्रार ढकल करायची असेल तर तुम्हाला आगोदर त्या वेबसाईट वर जाऊन तक्रार दाखल करा हा पर्याय निवडून तक्रार नोंदवा या पर्यावर क्लिक करायचे आहे.
किवा तुम्हाला आणखी जास्त माहिती किवा मदत हवी असेल तर १८०० ११६० ९० किवा pminternship@mca.gov.in यावर इमेल करू शकता किवा फोन करू शकता.
आशा आहे तुम्हाला या योजनेची सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल योज्नाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर ओफ़्फ़िसीअल वेबसाईट ला भेट द्या तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
धन्यवाद !!!!